ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
कृषी कायद्यांविरोधात दिल्लीच्या सीमेवर मागील 73 दिवसांपासून शेतकरी आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला धार देण्यासाठी आज दुपारी 12 ते 3 या ‘चक्का जाम’ आंदोलन करणार आहेत. आंदोलनादरम्यान ॲम्बुलन्स, स्कूल बस यासारख्या अत्यावश्यक सेवांना रोखले जाणार नाही, असे भारतीय किसान युनियनचे अध्यक्ष राकेश टिकैत यांनी स्पष्ट केले आहे.
दिल्ली-एनसीआर, उत्तरप्रदेश आणि उत्तराखंडात ‘चक्का जाम’ नाही
देशव्यापी ‘चक्का जाम’ मधून दिल्ली-एनसीआर, उत्तरप्रदेश आणि उत्तराखंड वगळण्यात आले आहे. सिंधू आणि टिकरी बॉर्डरवर शांततेत धरणे आंदोलन सुरू राहील.मात्र, उत्तरप्रदेश आणि उत्तराखंड या राज्यातील शेतकऱ्यांना केव्हाही दिल्लीत बोलावले जाऊ शकते.
देशभरातील शेतकऱ्यांनी आपापल्या भागात शांततेत आंदोलन करावे, असे आवाहनही टिकैत यांनी सांगितले.









