पंढरपूर / प्रतिनिधी
पावसामुळे चंद्रभागा नदी वरील कुंभार घाटावर नव्याने बांधलेला घाट खचला गेला. या मध्येच एका घराची जुनी भिंत देखील पडली. या भिंतीखाली चार ते पाच नागरिक अडकले असल्याची प्राथमिक माहिती आहे. याबाबत स्थानिक तरुण प्रशासनाच्या मदतीने मदतकार्य करीत आहेत. सदरची घटना घडतात तात्काळ प्रशासन हे घटनास्थळी पोहोचले.
जेसीबीच्या साह्याने घाट भरपावसात रिकामा करण्यात येत आहे.
बुधवारी सकाळपासूनच पंढरपुरात मुसळधार पाऊस आहे. उजनीतून चंद्रभागेत मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग येत असल्याने चंद्रभागा देखील दुथडी भरून वाहत आहे. अशातच मदत कार्य करण्यास अनेक अडचणी येताना दिसून येत आहेत
Previous Articleट्रकच्या टायरखाली सापडून पोलीस कॉन्स्टेबलचा मृत्यू
Next Article उत्तराखंड : मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतला ‘हा’ निर्णय









