पहिले अतिरिक्त जिल्हासत्र न्यायालयाचा निकाल
प्रतिनिधी/ बेळगाव
न्यू गुड्सशेड रोडवर चंदन तस्करी प्रकरणी खडेबाजार पोलिसांनी एका संशयिताला अटक केली होती. त्याला पहिले अतिरिक्त जिल्हासत्र न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. काही अटी घालून हा जामीन न्यायालयाने मंजूर केला आहे.
विशाल हणमंत बेळेकर (रा. गळतगा-भीमापूरवाडी, ता. चिकोडी) असे जामीन मंजूर झालेल्या संशयिताचे नाव आहे. 12 ऑगस्ट 2020 रोजी विशाल हा न्यू गुड्सशेड रोड येथे चंदन तस्करी करत आहे, अशी माहिती खडेबाजार पोलिसांना मिळाली होती. न्यू गुड्सशेड रोड चौथा क्रॉस येथे चंदन साठय़ासह एका तरुणाला संशयास्पदरित्या फिरताना पोलिस अधिकाऱयांना निदर्शनास आले. त्यांनी त्या तरुणाला 20 किलो गांजा व रोख 200 रुपयासह अटक केली. त्याच्यावर खडेबाजार पोलीस ठाण्यात कलम 86 व 87 अन्वये कर्नाटक वन खात्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर प्रकरणाची सुनावणी होवून संशयित विशाल बेळेकर याला काही अटींवर न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. संशयिताच्यावतीने ऍड. प्रताप यादव हे काम पाहत आहेत.









