ऑनलाईन टीम / मुंबई :
राज्यात नव्याने 7200 पोलीस कर्मचाऱयांची भरती करण्याचा निर्णय नुकताच गृहखात्याने घेतला आहे. भरती प्रक्रियेतील घोटाळे टाळण्यासाठी या भरतीची सर्व प्रक्रिया गृहखाते स्वत:च पार पाडणार आहे. गृहखात्याकडून यासंदर्भात माहिती देण्यात आली आहे.
कोरोना काळात पोलीस दलातील घटलेली कर्मचारी संख्या, निवृत्त अधिकारी आणि मागील दोन वर्षात फूलटाईम भरती न झाल्याने गृहखात्याने 7200 कर्मचाऱ्यांची पोलीस भरती करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, टीईटी, लष्कर आणि आरोग्य परीक्षांमध्ये समोर आलेल्या घोटाळय़ांमुळे गृह खातं स्वत:च ही भरती प्रक्रिया पार पाडणार आहे. यासाठी कोणत्याही एजन्सीला कंत्राट देणार नाही. सातत्याने समोर येणारे भरती प्रक्रियेतील घोटाळे लक्षात घेता गृहखात्याचा हा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. येत्या काही दिवसांमध्ये या भरती प्रक्रियेला सुरूवात होणार असल्याचे गृहमंत्रालयाने म्हटले आहे.