सर्वांनाच आपापली घरे सजविणे अगत्याचे वाटते. यासाठी आपण सजावटीच्या वस्तू, फुलांच्या माळा, झुंबरे, फर्निचर, पेंटींग्ज, मूर्ती इत्यादी वस्तूंचा उपयोग करतो. आपले वेगळे वैशिष्टय़ लोकांच्या दृष्टीला आणावयाचे असेल तर शिंपले, पक्ष्यांची घरटी, शंख किंवा रंगीबेरंगी खडे, मणी इत्यादी वस्तूंचा वापर केला जातो. तथापि, ब्रिटनमधील एका महाभागाने आपले घर सजविण्यासाठी चक्क जिवंत हॅण्डग्रेनेड्सचा उपयोग केल्याचे दिसून आले. हे हॅण्डग्रेनेड्स नकली किंवा दिखाऊ नसून खरोखरचे होते. त्याने ते केवळ घराची सजावट करण्यासाठी हजारो पौंड खर्च करून खरेदी केलेले होते. या हॅण्डग्रेनेड्सच्या माळा तसेच गुच्छ आणि काही सुटे हॅण्डग्रेनेड्स यांच्या साहाय्याने त्याने आपल्या घराचा दिवाणखाना सजविला होता. यासाठी वेगवेगळय़ा रंगाचे हॅण्डग्रेनेड्स त्याने हौसेने खरेदी केले होते.

हे हॅण्डग्रेनेड्स प्रारंभी शेजाऱयांना प्लास्टीकचे किंवा नकली असल्याचे वाटले. तथापि, काही जणांना संशय आला. आणि त्यांनी त्वरित पोलिसांना याची माहिती दिली. पोलिसांनी येऊन चौकशी केल्यानंतर हॅण्डग्रेनेड्स खरोखरचे असल्याचे समजले. त्यांचे अक्षरशः धाबे दणाणले. त्वरित पोलीस मुख्यालयाकडून आदेश घेऊन आजूबाजूची घरे रिकामी करण्यात आली. माणसांना आणि त्यांच्या पाळीव प्राण्यांना त्वरित तो परिसर सोडण्याचे आदेश देण्यात आले. हा प्रकार समरकोर्ट भागातील कॉर्नवॉल येथे घडला होता. बॉम्ब इतक्मया संख्येने होते, की समरकोर्टमधील असणारे बॉम्ब निकामी करणारे पथकही अपुरे पडत होते. यासाठी अन्य दूरच्या शहरांमधून बॉम्ब निकामी करणारी पथके बोलाविण्यात आली. त्यांनी त्वरित बॉम्ब निकामी करून तेथून दूर नेले. या बॉम्बचे डिटोनेटर काढण्यात आले नव्हते. त्यामुळे त्यांचा स्फोट होण्याची शक्मयता नव्हती. तरीही अपघाताने कोणताही भयानक प्रकार घडू शकला असता. एका बॉम्बचा जरी स्फोट झाला असता तरी ही संपूर्ण वस्ती उद्ध्वस्त होण्याची शक्मयता होती. या हौशी घरमालकाला आता अटक करण्यात आली असून याची चौकशी सुरू आहे. त्यांनी इतके बॉम्ब खरेदी का आणि कुठून केले? याची माहिती घेण्यात आली. त्याचा उद्देश केवळ घर सजविण्याचा होता, असे चौकशीतून निष्पन्न झाले आहे. तथापि, आपल्या जगावेगळय़ा शौकापोटी त्याने शेजारपाजाऱयांचा जीव टांगणीला लावलेला असल्यामुळे त्याला कारावासाची शिक्षा होणार, हे निश्चित मानले जात आहे.









