प्रतिनिधी / बार्शी
बार्शी तालुक्यातील गाडेगाव या गावातील सचिन बाळासाहेब कांबळे याने डि. सोलापूर सब डि. बार्शी, पैकी मौजे गाडेगांव येथील पूर्व-पश्चिम चालीचा रस्ता साधारणपणे २० फुट रुंदीचा गावातील मध्यवर्ती मुख्य वळण्याचे भागाकडे सचिन बाळासाहेब कांबळे रा. गाडेगांव यांनी घरकुल योजने अंतर्गत लाभार्थी म्हणून प्रत्यक्षात रस्त्यात अतिक्रमण करून बेकायदेशीर बांधकाम केलेले आहे. त्यामुळे मुख्य रस्त्यात रस्त्यास व वाहतुकीस सदरील अतिक्रमणामुळे मौजे गाडेगांवातील ग्रामस्थांना वाहतुकीस अडथळा निर्माण होत असल्याने याच गावातील अमोल भालके यांनी या अतिक्रमण बाबत तक्रार देऊनही न्याय न मिळाल्याने बार्शी पंचायत समिती समोर बेमुदत अन्नत्याग सत्याग्रह करणार असल्याचे निवेदन दिले आहे.
या वेळी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सचिन बाळासाहेब कांबळे हा आडदांड, खुनशी व राजकीय अश्रित असून त्याचे शासकीय अधिकारीचे लागेबांधे आहेत. त्या बाबत वेळोवेळी संबंधीत अधिकाऱ्यामार्फत, वकीलामार्फत नोटिसा पाठवूनही दखल घेतलेली नाही. पंचायत समिती बार्शीचे पत्रान्वये अतिक्रमण असल्याबाबत व त्या अनुषंगाने अतिक्रमण काढून टाकणेचा आदेश दिलेला असताना.
कोणतीही सक्षम कारवाई झालेली नाही. तसेच पंचायत समिती बार्शीचे कार्यालयाकडून पत्रान्वये सदरील ग्रामपंचायतीस वरील लाभार्थ्याच्या अतिक्रमणाविरुध्द त्वरीत कारवाई करण्याचे आदेश दिले असतानाही सदरील ग्रामपंचातीने त्यावर कोणतीही कारवाई केलेली नाही. पंचायत समिती व संबंधित कार्यालयाकडे वारंवार दाद मागूनही अद्याप पर्यंत संबंधित प्रकारावर कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही.
तरी सदरील घरकुल घोटाळ्याची चौकशी व बांधकाम अतिक्रमण बाबत कारवाई करणेसाठी भालके व गाडेगांवमधील ग्रामस्थ दि. सोमवार 1 फेब्रुवारी रोजी बार्शी पंचायत समिती कार्यालयासमोर अन्नत्याग सत्याग्रहासाठी बसणार असल्याचे म्हटले आहे.









