प्रतिनिधी / बेळगाव :
मागील वषी झालेल्या दमदार पावसामुळे रयत गल्ली, वडगाव येथील अर्चना शिवाजी बिर्जे यांचे घर कोसळेल होते. मात्र त्यांना अद्याप कोणतीच नुकसान भरपाई देण्यात आली नाही. अर्ज भरुन देखील त्यांच्याकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. या पडक्मया घरातच ही महिला आपल्या मुलांसह राहत आहे. मात्र कधी घर कोसळेल हे सांगता येत नाही. तेंव्हा या कुटुंबाकडे जिल्हा प्रशासन लक्ष देणार काय? असा सवाल उपस्थित होत आहे.
महापूरामुळे अनेकांना फटका बसला आहे. अनेकांची घरे कोसळली. रयत गल्ली, वडगाव येथील या महिलेची देखील घर कोसळले. मात्र कोणच अधिकारी फिरकला नाही. त्यामुळे हे कुटुंब नुकसानीपासून वंचित आहे. एक तर मोलमजुरी करुन आणि शेती काम करुन आपला उदरनिर्वाह हे कुटुंब करत आहे. लहान मुले घेऊन मी भाडोत्री घरात राहणे देखील अशक्मय असल्याचे या महिलेने सांगितले आहे. तेंव्हा अधिकाऱयांनी याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे.
सध्या कोरोनामुळे आणखीनच गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. घर बांधणे अशक्मय आहे. जुने घर असल्यामुळे मोठय़ा भिंती आहेत. त्या भिंतींची माती काढुन बाजुला टाकायला देखील दोन ते तीन लाख रुपये खर्च येणार आहे. त्यानंतर इमारत बांधायला देखील खर्च लागणार आहे. इतका खर्च करणे अशक्मय आहे. तेंव्हा अधिकाऱयांनी या घराची पाहणी करुन नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी हे गरीब कुटुंब करत आहे.









