मागिल काही महिन्यांपासून राज्यात मराठा समाज आणि धनगर समाजाच्या आरक्षण मुद्यावरून चांगलेच वातावरण तापले आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना नेते विनायक राऊत यांनी भाजपवर घणाघाती हल्ला चढवला आहे.
- काल संसदेत भाजपचे भिंग फुटले
ते म्हणाले, घटना दुरुस्ती विधेयकावर चर्चा करताना आम्ही आरक्षणाची 50 टक्क्यांची मर्यादा शिथिल करण्याची सूचना केली. या उपसूचनेवर संसदेत मतदान झाले. त्याला काँग्रेससहीत इतर खासदारांनी पाठिंबा दिला. पण भाजपने या दुरुस्तीविरोधात मतदान केले. रावसाहेब दानवे यांनी तर तोंडही उघडले नाही. त्यामुळे भाजप हा मराठा आणि धनगर आरक्षण विरोधी असल्याचे उघड झाले आहे. मात्र, मराठा, धनगर किंवा इतर समाजाच्या आरक्षणासंदर्भात ज्यांना कळवळा आला होता, काल संसदेत भाजपचे भिंग फुटले. भाजपचे मराठा-धनगर आरक्षणाचा कळवळा असल्याचे बिंग संसदेत फुटल्याची खोचक टीका विनायक राऊत यांनी केली आहे.
याबाबत बोलताना पुढे ते म्हणाले, 127 व्या घटनादुरुस्तीने सर्व अधिकार पुन्हा राज्यांना देताना राज्यांना आरक्षण देताना कोणतीही अडचण येणार नाही, याची दक्षता केंद्राने घ्यायला हवी होती. पण दुर्दैवाने असे झाले नाही. घटनादुरुस्ती विधेयकामध्ये स्पष्टता नाही, असे स्पष्ट मत विनायक राऊत यांनी व्यक्त केले आहे.
- आरक्षणावर बोलण्याचा नैतिक अधिकार भाजपने गमावला
भाजपचे मराठा, धनगर समाजावर असलेले प्रेम म्हणजे पुतना मावशीचे प्रेम आहे. कालच्या दुरुस्तीला समर्थन न करून मराठा आणि धनगर समाजाचा विश्वासघात राज्यातील भाजप नेत्यांनी, खासदारांनी केला आहे. आरक्षणावर बोलण्याचा नैतिक अधिकार भाजपने गमावला आहे. असेही त्यांनी यावेळी स्पष्टपणे म्हटले आहे. केले. तसेच आता देवेंद्र फडणवीस कोणत्या तोंडाने आरक्षणावर बोलणार ? असा सवाल देखिल राऊत यांनी यावेळी उपस्थित केला.








