ठराविक पेट्रोल पंपासोबत महापालिकेचे लागेबांधे असल्याचा आरोप
प्रतिनिधी / मिरज
मिरज आणि कुपवाडमधील महापालिकेच्या घंटागाड्य़ांना डिझेल भरण्यासाठी सांगलीला हेलपाटे मारावे लागत असल्याने डिझेलवर विनाकारण लाखोंची उधळपट्टी होत असल्याची बाब माहिती अधिकारातून निदर्शनास आल्यानंतर आम आदमी पक्षाने महापालिका प्रशासनाला चांगलेच धारेवर धरले आहे. मिरज आणि कुपवाडमध्ये पेट्रोल पंप असताना सांगलीच्या पेट्रोल पंपावर डिझेल भरण्याची सक्ती का? याचा खुलासा करावा, अशी मागणी करण्यात आली आहे. महापालिकेने याबाबत ठोस खुलासा न केल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही देण्यात आला आहे.