वृत्तससंस्था/ विजेक ऍन झी
हॉलंडमध्ये सुरू असलेल्या टाटा स्टील पुरस्कृत आंतरराष्ट्रीय मास्टर्स बुद्धिबळ स्पर्धेत भारताचा ग्रॅण्डमास्टर आणि यापूर्वी पाचवेळा विश्व विजेतेपद मिळविणारा विश्वनाथन आनंदने 11 व्या फेरीअखेर गुणतक्त्यात संयुक्त सहावे स्थान मिळविले आहे.
या स्पर्धेतील आनंदने 11 व्या फेरीत इराणच्या फिरोजियाचा पराभव करत पूर्ण गुण वसूल केला. या लढतीत आनंदने निमझो इंडियन बचाव तंत्राचा अवलंब केला होता. या स्पर्धेत 11 व्या फेरी अखेर अमेरिकेच्या फेबियानो केरूनाने आठ गुणांसह आघाडीचे स्थान मिळविले आहे. 11 व्या फेरीतील लढतीत केरूनाने बेलारूसच्या कोव्हालेव्हचा पराभव केला.
नॉर्वेचा ग्रॅण्डमास्टर कार्लसन 7 गुणांसह दुसऱया स्थानावर आहे. अमेरिकेचा सो 6.5 गुणांसह तिसऱया स्थानावर असून पोलंडचा डुडा आणि हॉलंडचा फोरसेट हे प्रत्येकी 6 गुणांसह संयुक्त चौथ्या स्थानावर आहेत. चॅलेंजर विभागात स्पेनच्या गुजेरोने ऑस्ट्रेलियाच्या सिमेरनोव्हचा पराभव करत आघाडीचे स्थान मिळविले आहे. या विभागात भारताचा सुर्य शेखर गांगुली 6.5 गुणांसह संयुक्त चौथ्या तर निहाल सरीन 5.5 गुणांसह संयुक्त सातव्या स्थानावर आहे.









