प्रतिनिधी/सातारा
जिल्हाधिकारी आदेशाचे उल्लघन करत ग्रीन फिल्ड हॉटेल सुरु ठेवल्याप्रकरणी चौदा जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. दि. 10 रोजी रात्री पावणे दहा वाजता हॉटेल ग्रीन फिल्ड सुरु ठेवले होते. त्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यात वैभव सुरेश लवळे, भारत विकास शिंदे, किचनमधील विनेश संजय फडतरे, ओंकार सुजय जगताप, निलेश प्रकाश चव्हाण, हर्षवर्धन अभ्युदय पाटील, विराज विजय देशमुख, हर्षदा विजय देशमुख, चंद्रसेन लालासाहेब पवार, विजेंद्रकुमार विश्वकर्मा, अनिरुद्ध धनाजी शिंदे, राहुल वसंत लखापती, अभिजीत भानुदास सावंत, धर्यशील शशिकांत फडतरे यांच्यावर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पोलीस नाईक घाडगे तपास करत आहेत.







