ऑनलाईन टीम / नवी दिल्ली
देशात कोरोना संसर्गाचा फैलाव होत आहे. हा फैलाव देशातील शहरी भागाबरोबर आता ग्रामीण भागातही होत असून याचा वेग चिंता करायला लावणारा आहे. यावर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ही भाष्य केलं असून नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे.याच पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने शहरी भागासोबत आता ग्रामीण भागासाठी ही कोरोना रोखणारी केंद्राची नवी नियमावली जारी केली आहे.
या नियमावलीत रुग्णांची देखभाल, स्क्रिनिंग आयसोलेशनवर, तसेच कोरोना रुग्णांनी घ्यावयाची काळजी, आवश्यक सुचना आणि त्याबद्दल सुक्ष्म माहिती देणारी नियमावली जारी केली आहे. ज्याचा उपयोग कोरोना रुग्णांना कोरोना संसर्गातून बाहेर पडण्यासाठी होणार आहे. नव्या नियमावलीत आशा वर्कसंना सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच आरोग्य अधिकारी आणि एएनएमला रॅपिड अँटीजन टेस्ट करण्याचं प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
प्रत्येक आरोग्य केंद्रात आणि उप केंद्रात हे टेस्ट किट उपलब्ध करून दिलं जाणार आहे. या द्ववारे गावा गावात जाऊन आशा वर्कस गावातील सर्दी, ताप असणाऱ्या नागरिकांची नोंद करण्यात येणार आहे तसेच कोरोनाची लक्षणे असणाऱ्या नागरिकांना आरोग्य अधिकाऱ्यांकडून तपासणी करण्याचे आदेश देण्यात येणार आहेत.








