प्रतिनिधी/ कास
कोरोनाचा देशाच्या अनेक प्रमुख शहरांमध्ये कहर सुरु असतानाच आता कोरोनाची पाळेमुळे गावाकडे वाटचाल करू पाहत आहेत मात्र गावगावातील नागरीक व ग्रामस्तरीय समीत्यांनी गाफील न राहाता शासनाच्या सुचनांचे व नियमांचे पालन करून कोरोनाला आपल्या गावात प्रवेश करु न देऊन हरविण्याची हिच ति खरी वेळ आहे
सुरवातीला सहा माहिन्यापुर्वी चिन देशामध्ये कोरोना रोगाचा प्रारंभ झाला तेथेही त्यांने कहर केला मात्र आपुया माहिती मुळे अनेक देश गाफील राहिल्याने कोरोनाचा प्रर्दुभाव जगभर पसरला भारताची जागतीक वाहतुक दळणवळण सेवा सुरु राहील्याने अनेक देशातुन नागरीक कोरोना घेऊन भारतात परतले त्यांना विमानतळावरच विलगीकरण कक्षात व होमकॉरांटाईन कींवा त्यांच्या कोरोनाच्या तपासण्या केल्या नसल्याने कोरोना देशाच्या मोठमोठया शहरांमध्ये दाखल झाला अनं अखेर देश लॉकडाऊन करावा लागला दिड महिन्यापासुन देश लॉकडाऊन असुन कोरोनाला गतिरोधक मिळाला असला तरी कोरोनाचा देशात प्रर्दुभाव थांबला नसुन प्रमुख अनेक शहरांना कोरोना वेढा घालताना दिसत असुन आता गावांकडे वाटचाल होताना दिसत आहे
कोरोनाचा प्रारंभ चिनमध्ये झाला आणी तेथे कोरोनाचा कहरही मात्र देशातील नागरीकांना वाटत होते की कोरोना आपल्यापर्यंत पोहचुच शकत नाही आणी बघता बघता कोरोना जगासह देशातही पोहचला अनेक शहरांमध्ये कोरोनाचा कहरही सुरू असुन प्रशासन कोरोनाची साखळी तोडण्याचे जोरदार प्रयत्न करत असुन अनेक ठिकाणी साखळी तोडण्यास यश येत असले तरी काही बेजबाबदार नागरीकांमुळे त्यांच्या इतरत्र प्रवासामुळे नविन कोरोनाच्यासाखळ्या निर्माण होत आहेत
राज्यातील काही तुरळक गावे वगळता कोरोना शहरातच मोठयाप्रमाणात असुन तो गावांमध्येही यायला वेळ लागणार नाही आता गावांतील नागरीकांनी कोरोनाचे गर्भिर्य ओळखुन सतर्क व्हा अन्यथा गावामध्येही कोरोनाचे थैमान सुरू होईल आणी नियमांचे पालन होत नसल्याने प्रशासनही हतबल होवु शकते आता मुंबई पुणे सह प्रमुख शहरातील गर्दी कमी होण्यासाठी नागरीकांना तपासणी करून आपआपल्या गावाकडे सोडत आहेत तर काही चाकरमाणी पळवाटेने गावात दाखल होत आहेत मात्र गावकयांनी चाकरमाण्यांशी वादविवाद न करता शासनाने घालुन दिलेल्या नियमांची कडक अंमलबजावणी करने महत्वाचे असुन स्थानिकांच्याही इतरत्र प्रवासाला आळा घालणे गरजेचे आहे आता गावात दाखल होणाया चाकरमान्यांना काही दिवस विलकीकरण कक्ष किंवा होमकॉरंटाईन करने सक्तीचे असुन आता चुकीला माफी नाही अन्यथा कोरोनाचा कहर होईल त्यामुळे गावकयांनो सतर्क होण्याची हिच ति खरी वेळ आहे









