प्रतिनिधी / पलूस
ग्रामपंचायत रामानंदनगर,ग्रामसेवक तसेच बँक शाखा अधिकारी यांची खातेनिहाय चौकशी होऊन कारवाई न झाल्याने युवासेनेचे बेमुदत उपोषण रामानंदनगर ग्रामपंचायत यामध्ये ग्रामपंचायत फंडातून केलेल्या लहान मुलांच्या खेळणी कामाच्या रकमेत गैरव्यवहार केले बाबत युवासेनेच्या वतीने दिनांक २२/०७/२०१९ पासून पाठपुरावा करूनही आज अखेर त्यांच्यावरती कोणतीही चौकशी करून कारवाई केली नसून पंचायत समिती गट विकास अधिकारी त्यांना पाठीशी घालण्याचे काम करीत आहेत.
त्यांच्या निषेधार्थ मंगळवार दिनांक ०५/०१/२०२१ रोजी पलूस तहसील कार्यालय समोर बेमुदत उपोषण करीत असल्याचे युवासेना जिल्हा प्रमुख विनायक गोंदिल यांनी सांगितले त्यावेळी ते म्हणाले आम्ही उपोषणास रीतसर परवानगी घेतली असून जनतेच्या पैशांवरती व शासनाच्या निधी वरती डल्ला मारणाऱ्यांवरती फौजदारी कारवाई केल्या शिवाय बेमुदत उपोषण पाठीमागे घेतले जाणार नाही.