वार्ताहर / सांबरा
मुतगे ग्रा. पं. सदस्य सुनील वसंत चौगुले यांनी आपल्या वाढदिवसाचे औचित्य साधून ग्रामस्थांच्या सेवेसाठी रुग्णवाहिका उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे ग्रामस्थांतून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
सध्या सर्वत्र कोरोना महामारीमुळे नागरिकांवर संकट ओढवले आहे. त्यामुळे अनेक सामाजिक संस्था मार्फत व समाजसेवकांमार्फत वेगवेगळे उपक्रम राबवून नागरिकांची मदत करण्यात येत आहे. बऱयाच वेळेला नागरिकांना दवाखान्याला वेळेवर पोहोचता येत नाही. अशावेळी त्यांच्यावर वेळेवर उपचार होत नाहीत. त्यामुळे याची जाणीव ठेवून सुनील वसंत चौगुले यांनी ग्रामस्थांसाठी रुग्णवाहिका उपलब्ध करून दिली आहे. त्यांनी आपल्या वाढदिनी आपले वडील कै. वसंत चौगुले यांच्या स्मरणार्थ ग्रामस्थांसाठी रुग्णवाहिका उपलब्ध करून दिली आहे. सध्या अनेक गावातून वेगवेगळय़ा उपक्रमातून नागरिकांना सहकार्य करण्यात येत आहे. सुनील चौगुले यांनीही सामाजिक बांधिलकीचे भान ठेऊन रुग्णवाहिका उपलब्ध करून दिल्याने ग्रामस्थांतून समाधान व्यक्त होत आहे.