मागील दोन वर्षांपासून कामगारांचे वेतन नाही, अनेकांनी दिला आंदोलनाचा इशारा तर काही जणांनी सांगितला आत्महत्येचा पर्याय, वेतन कधी होणार याकडे कामगरांच्या नजरा
प्रतिनिधी /बेळगाव
ग्राम पंचायत कार्यक्षेत्रात कोणत्याही कामाची अडचण निर्माण झाली तर पहिल्यांदा आपण क्लार्क, वॉटरमनसह इतर कामगारांना हाक मारतो. त्यामुळे त्यांचे कार्य कौतुकास्पद आहे. अशा परिस्थितीत कोरोना काळात त्यांनी केलेल्या कामामुळे तेही कोरोना योद्धय़ेच म्हणावे लागतील. मात्र सरकारी काम आणि बारा महिने थांब… अशी म्हण प्रचलीत असताना आता सरकारी कामगारांना 24 महिने थांब म्हणण्याची वेळ आली आहे. अनेक ग्राम पंचायतींमधील कर्मचाऱयांचा पगार तब्बल दोन वर्षांपासून देण्यात आला नाही. त्यामुळे मोठी समस्या निर्माण झाली असून अनेकांनी ग्राम पंचायतसमोर धरणे आंदोलन तर काही जणांनी आत्महत्येचा इशाराही दिला आहे. मात्र याचे सोयरसुतक पिडीओ किंवा वरि÷ अधिकाऱयांना नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे तातडीने त्यांचे वेतन द्यावे, अशी मागणी होत आहे.
बेळगाव तालुक्मयातील बिजगर्णी, बेळवट्टी, बाळेकुंद्रीसह अनेक ग्राम पंचायतींच्या कामगारांचे वेतन देण्यात आले नसल्याने अनेक कर्मचाऱयांवर आर्थिक संकट कोसळले असून काही जणांनी तर आत्महत्येचा इशारा दिला आहे. परिणामी कर्मचाऱयांची अवस्था चिंताजनक असून वरि÷ अधिकाऱयांनी तातडीने याकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे. नुकत्याच ग्राम पंचायत निवडणुका झाल्या आहेत. त्यातच नूतन काही ग्राम पंचायत सदस्यही याच कामगारांना धमकावत असतात. काही जणांनी तर तुम्हाला कामावरून काढुन टाकतो, तुमचे काम बरोबर नाही, अशा धमक्मयाही देण्यात येतात. कामासंदर्भात काही गोष्टी योग्य पण असतील. मात्र मागील दोन वर्षांपासून त्यांचे वेतन नाही. तेंव्हा याच सदस्यांनी त्यांचे वेतन देण्यासाठी का प्रयत्न करू नयेत? असा सवालही उपस्थित होत आहे.
काहींनी तर आर्थिक टंचाई भागविण्यासाठी व कुटुंबाचा गाडा ओढण्यासाठी अनेकांकडून हातउसणे घेतले आहेत तर काहींनी व्याजावर पैसे काढले आहेत. मागील दोन वर्षांपासून पगार न झाल्याने त्यांची व्याजाची रक्कमही मोठी झाली असून व्याजासाठी होणारा त्रास मोठा आहे. परिणामी पिडीओ व तालुका पंचायतमधील वरि÷ अधिकाऱयांचा पगार वेळेवर होत आहे. त्यामुळे कनिष्ठ कर्मचाऱयांचे कायतरी होऊ दे, असेच साऱयांना वाटत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे वरिष्ठ अधिकाऱयांनी व पिडीओंनी त्यांचेही वेतन देण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे.
बेळगाव तालुक्मयातील सुमारे 10 ते 15 ग्राम पंचायतींमधील कर्मचाऱयांचा पगार मागील दोन ते अडीच वर्षांपासून देण्यात आला नाही. त्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली असून त्यांच्या कुटुंबीयांची अवस्था दयनीय झाली आहे. अशा परिस्थितीत त्यांच्याकडे वरिष्ठ अधिकाऱयांनी लक्ष देण्याची गरज असून तातडीने त्यांचा पगार जमा करावा, अशी मागणी कर्नाटक राज्य ग्राम पंचायत नोकर संघाच्यावतीने केली होती. मात्र याकडे साफ दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे.
मागील दोन वर्षांपासून कोरोनाचा प्रादुर्भाव सुरूच आहे. मात्र अजूनही त्यांना वेतन आले नसल्याने समस्या निर्माण होत आहे. म्हैसूर जिह्यातील नंजनगोडू तालुक्मयातील एका ग्राम पंचायतीमध्ये असाच प्रकार घडला होता तर बेळगाव जिह्यातही अनेक ग्राम पंचायतींमध्ये असेच प्रकार घडले आहेत. तेंव्हा तातडीने पगार देण्याची मागणी ग्राम पंचायत कर्मचाऱयांकडून होत आहे.









