-तरूण भारतचे मुख्य प्रतिनिधी संजीव खाडे यांचा सामाजिक कृतज्ञता पुरस्काराने गौरव
प्रतिनिधी/कोल्हापूर
वाचन संस्कृती लोप पावत असताना वाचन संस्कृती रुजावी म्हणून आयोजित केलेल्या निर्मिती प्रकाशनच्या प्रदर्शन सर्वोत्कृष्ठ ग्रंथ आहेत. ग्रंथांच्या माध्यमातून ही एक प्रकारची साहित्यिक मेजवानी आहे, असे प्रतिपादन माजी मंत्री आणि साहित्यिक प्रा. लक्ष्मणराव ढोबळे यांनी केले.
आदित्य सभागृह येथे निर्मिती प्रकाशनच्या पुस्तक प्रदर्शनाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. दरम्यान `साहित्य सम्राट अण्णा भाऊ साठे यांच्या साहित्यावर झालेल्या चर्चेत मान्यवर सहभागी झाले होते. अध्यक्षस्थानी इतिहास संशोधक डॉ. कपिल राजहंस होते. हे ग्रंथ प्रदर्शन 10 नोव्हेंबरपर्यंत सर्वांसाठी खुले राहणार आहेत. एक पुस्तक घेतल्यानंतर त्याच किंमतीचे दुसरे पुस्तक भेट स्वरूपात मिळणार आहे. तरूण भारतचे मुख्य प्रतिनिधी संजीव खाडे यांना सामाजिनक कृतज्ञता पुरस्कार देवून गौरवण्यात आले.
प्रा.ढोबळे म्हणाले, सोशल मीडियाच्या अतिरिक्त वापरामुळे एका बाजूने वाचन संस्कृती लोप पावत आहे. तरीही ग्रंथ प्रदर्शनातून वाचन संस्कृती वाढवण्याचा निर्मितीचा प्रयत्न चांगला आहे. पुस्तकांच्या किंमतीत सवलत योजना देऊन वाचन संस्कृती वृद्धिंगत करण्यासाठीचा पुढाकार घेत आहेत, ही सुखद बाब आहे. प्रा. किसनराव कुराडे म्हणाले, तरूणांनी सोशल मिडीयावर वाहात न जाता तरूणांनी वाचन संस्कृतीकडे वळले पाहिजे. सूत्रसंचालन शांतीलाल कांबळे यांनी केले. यावेळी साहित्यिक चंद्रकांत सावंत, अब्राहम बापू आवळे, प्रकाश शिंदे, क्रांतीताई आवळे, अनिल म्हमाणे, दादासाहेब तांदळे, मंदार पाटील मान्यवर उपस्थित होते.
अण्णा भाऊ साठे यांच्या साहित्यातून कष्टकऱयांच्या कष्टाची अनुभुती
अण्णा भाऊ साठे यांनी आपल्या साहित्यातून कष्टकऱयांच्या कष्टाची अनुभुती येते. त्यांचे साहित्य म्हणजे प्रस्थापितांच्याविरूध्द थोपटलेले दंडच म्हंटले तरी वावगे ठरणार आहे, अशा शब्दात चर्चे दरम्यान प्रा. लक्ष्मण ढोबळे यांनी एकूणच अण्णा भाऊ साठे यांच्या साहित्याचा आढावा घेतला. पत्रकार मोहन मिस्त्री, शिवाजी यादव, प्रवीण मस्के, अभिजित जाधव, वैभव गोंधळी, आदित्य वेल्हाळ, ताज मुलाणी, एकनाथ पाटील, सतेज औंधकर, ज्ञानेश्वर साळोखे, सुभाष गायकवाड, राहुल जगताप, जितेंद्र शिंदे, प्रकाश कांबळे यांनाही सामाजिक कृतज्ञता पुरस्काराने गौरवण्यात आले.