अभिनेत्रीने शेअर केली पोस्ट
बॉलिवूड अभिनेत्री गौहर खान आणि जैद दरबार यांना पुत्ररत्न झाले आहे. गौहरने बुधवारी मुलाला जन्म दिला आहे. गौहर खानच्या चाहत्यांनी तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. याचबरोबर अनेक कलाकार तिला आणि जैदला सोशल मीडियाच्या माध्यमातून शुभेच्छा देत आहेत.

गौहरने प्रसूतीनंतर एक छायाचित्र शेअर केले आहे. खऱ्या अर्थाने आम्हाला 10 मे रोजी आनंदाची अनुभूती झाली आहे. आमचा मुलगा सर्वांना त्यांचे प्रेम आणि प्रार्थनांसाठी धन्यवा देतोय असे गौहरने स्वत:च्या पोस्टमध्ये नमूद केले आहे. अभिनेत्रीच्या पोस्टवर अनुष्का शर्मा, अनिता हसनंदानी, विक्रांत मैसी, किश्वर मर्चंट, डब्यू रतलानी, युविका चौधरी समवेत अनेक कलाकारांनी शुभेच्छा दिल्या आहेत.
दीर्घकाळापर्यंत रिलेशनशिपमध्ये राहिल्यावर गौहर अन् जैदने डिसेंबर 2020 मध्ये विवाह केला होता. गौहर अन् जैद यांच्या वयात 12 वर्षांचे अंतर आहे. जैद हा एक नृत्यदिग्दर्शक आहे. तसेच तो संगीत दिग्दर्शक इस्माइल दरबार यांचा पुत्र आहे.









