प्रतिनिधी/दिल्ली
भारताचा माजी क्रिकेटपटू आणि भाजपा आमदार गौतम गंभीरला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. यांनतर गंभीरनेच पोलिसांकडे तक्रार केली होती. दोनवेळा गौतम गंभीरला धमकी देण्यात आली होती. दरम्यान, पोलीसांनी केलेल्या तपासात मोठा खुलासा झाला आहे. गौतम गंभीरला धमकीचा मेल पाकिस्तानातून आला होता. गौतम गंभीरने आरोप केला होता की त्याला आयएसआयएस काश्मीरकडून जीवे मारण्याच्या धमक्या आल्या होत्या. पण ज्या सिस्टीमद्वारे हा मेल पाठवला गेला त्याचा आयपी अॅड्रेस पाकिस्तानमध्ये सापडला आहे. दिल्ली पोलिसांनी गुगलकडून माहिती मागवली होती. गुगलने दिलेल्या माहितीनुसार, गौतम गंभीरला धमकीचा ईमेल पाकिस्तानमधून पाठवण्यात आलाय.
दरम्यान, भारताचा माजी क्रिकेटपटू आणि पूर्व दिल्लीतील भाजपचा खासदार गौतम गंभीर याला ISIS काश्मीरकडून जीवे मारण्याची धमकी मिळाल्यांनतर गंभीर याने याबाबत पोलिसांत तक्रार दाखल दिली होती. यांनतर गंभीर त्यांच्या घराबाहेर सुरक्षा यंत्रणा वाढविण्यात आली. दिल्ली मध्यच्या पोलीस उपायुक्त श्वेता चौहान यांनी यासंदर्भात माहिती दिली देताना, आयएसआयएस काश्मीरने 23 नोव्हेंबर 2021 रोजी रात्री 9 वाजून 32 मिनिटांनी एका ई-मेलमध्ये गौतम गंभीर आणि त्यांच्या कुटुंबियांना जीवे मारण्याची धमकी दिल्याचे सांगितले. तसेच जीवे मारण्याच्या धमकीच्या आशयाचे पत्र गंभीर याच्या कार्यालयाकडून आम्हाला प्राप्त झाले असून, त्यामध्ये पोलिसांनी या प्रकरणामध्ये लक्ष घालून तपास करावा, असे म्हटले होते. यानुसार तपास केला असता गौतम गंभीरला धमकीचा ई-मेल पाकिस्तानातून आल्याचे तपासातून समोर आले आहे.