वार्ताहर / गोकुळ शिरगाव
कोरोना विषाणूच्या वाढत्या संसर्गामुळे संस्थेची वार्षिक सर्व साधारण सभा ऑनलाईन घेण्याचे निश्चित करण्यात आले होते. त्यानुसार गोकुळ शिरगांव मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (गोशिमा) ची ३१ वी वार्षिक सर्व साधारण सभा आज दि. १८, सप्टेंबर रोजी दुपारी १२.०० वा. ऑनलाईन संपन्न झाली. या सभेमध्ये आमदार चंद्रकांत जाधव यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
त्यामध्ये त्यांनी कोविड-19 कालावधीत उद्योग सुरु करणेसाठी शासन दरबारी प्रयत्न करून टप्पा-टप्प्याने उद्योग चालू केले व सध्या उद्योग चालू आहेत. उद्योगाचे वाढलेले वीजदराबाबत काही दिवसात उद्योजकांना गोड बातम्या मिळतील याची ग्वाही यावेळी त्यांनी दिली. त्यानंतर गोशिमाचे अध्यक्ष. सचिन शिरगावकर यांनी वर्षाचा कामाचा आढावा ऑनलाईन उपस्थित सभासद यांना सांगितला व कोविड-19 च्या परिस्थितीनंतर सर्वच क्षेत्रात मोठ्या प्रमाणात बदल दिसून येणार आहेत. त्यासाठी उद्योजक यांनी कर्मचाऱ्यांशी संवाद साधून या कोविड-19 सदृश्य परिस्थितीतून पुढे जाणे गरजेचे आहे. त्यानंतर इतिवृत्त वाचन संस्था सचिव कृष्णात सावंत यांनी केले.
त्याच बरोबर अहवाल वाचन मोहन पंडितराव , मानद सचिव यांनी केले व जमा – खर्चाचे वाचन खजिनदार नितीनचंद्र दळवाई यांनी केले यानंतर कोल्हापूर फौंड्री क्लस्टर आढावा अजित आजरी यांनी सांगितला .संस्थेच्या वतीने पहिल्यांदाच अशी ऑनलाईन वार्षिक सर्व साधारण सभा घेण्यात आलेली आहे. या सभेमध्ये संस्थेच्या जास्तीत जास्त सभासदांनी सहभाग घेऊन सभा यशस्वी केली. यावेळी संस्थेचे पदाधिकारी गोशिमा मध्ये एकत्र येऊन त्या ठिकाणावरून सदर ऑनलाईन सभेचे ऑपरेटिंग केले. या सभेसाठी ऑनलाईन उपस्थित सभासदांचे आभार संस्थेचे उपाध्यक्ष श्रीकांत पोतनीस यांनी मानले . या सभेसाठी आमदार.श्री.चंद्रकात जाधव .सचिन शिरगांवकर, अध्यक्ष.श्रीकांत पोतनीस, उपाध्यक्ष .मोहन पंडितराव, सभासद उद्योजक मोठ्या संख्येने हे मान्यवर उपस्थित होते.
Previous Articleमागील 24 तासात महाराष्ट्रात 434 पोलीस कोरोना पॉझिटिव्ह; 4 मृत्यू
Next Article मायक्रो फायनान्स प्रकरणी अभ्यासगट नियुक्त









