बेळगाव / प्रतिनिधी
बेळगावमधून दररोज 250 ते 300 ट्रक भाजीपाला गोव्याला जातो. परंतु सध्या गोव्याची सीमा बंद असल्यामुळे भाजीपाल्याची वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. त्यामुळे आलेली भाजी स्थानिक विपेत्यांनाच द्यावी लागत आहे. त्याला तितकासा दर नसल्यामुळे कवडीमोल दराने भाजी विक्री करावी लागत आहे. शनिवारी बेळगावच्या एपीएमसी मार्केटमध्ये 150 हून अधिक ट्रक भाजीपाला येऊनही उचल नसल्याने तो रस्त्यावर टाकण्याची वेळ आली आहे.
बेळगावच्या एपीएमसी मार्केटमध्ये सलग दुसऱया दिवशीही गोंधळ झाला. मध्यरात्री 2 वाजल्यापासून शेतकऱयांनी शेतीमाल एपीएमसीमध्ये आणूनही सकाळी एकाचवेळी गर्दी झाल्यामुळे शेतकऱयांना हुसकावून लावण्याचे काम पोलिसांना करावे लागले. सौदे न झाल्यामुळे शनिवारी भाजी रस्त्यावर फेकण्याची वेळ आली. एपीएमसी प्रशासनाच्या ढिसाळ नियोजनाचा शेतकरी व व्यापाऱयांना लाखो रुपयांचा फटका बसला आहे.
कोरोनामुळे शेतकऱयांचे हाल होत आहेत. शनिवारी रात्रीपासून कोबी, फ्लॉवर, मिरची, वांगी, भोपळा, शिमला मिरची, दोडकी, काकडी, बीट, टोमॅटो यांची मोठय़ा प्रमाणात आवक झाली होती. चार पैसे मिळतील म्हणून मध्यरात्रीपासूनच शेतकरी एपीएमसीमध्ये दाखल झाले होते.
सकाळी 7.30 च्या सुमारास शेतकऱयांची मोठी गर्दी झाली. गर्दी आवाक्मयाच्या बाहेर गेल्यामुळे अखेर पोलिसांनी शेतकऱयांना सौम्य लाठीचार्ज करीत हुसकावून लावले. यामुळे शेतकऱयांनी कृषिमाल जागेवरच टाकून घरी जाणे पसंत केले. सकाळी 11 पर्यंतच व्यापार करण्याची परवानगी देण्यात आली होती. योग्य उचलही नसल्याने भाजी रस्त्यावर पडून आहे. यामुळे लाखो रुपयांचा तोटा शेतकरी व व्यापाऱयांना बसू लागला आहे. शनिवारी दुपारपर्यंत मुख्य गेटपासून बेळगावच्या दिशेने वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.
शहरात 40 रु. किलो दराने भाजीची विक्री
शहरात काही मोजक्मयाच ठिकाणी भाजी उपलब्ध आहे. तीदेखील अक्वाच्या सक्वा दराने विक्री करण्यात येत आहे. टोमॅटो, वांगी 40 रु. प्रति किलो दराने विक्री केली जात आहे. इतर भाज्याही दुप्पट दराने विक्री केल्या जात आहेत. दुसरीकडे एपीएमसीमध्ये दर नसल्यामुळे रस्त्यावर भाजी फेकण्याची वेळ आली आहे. त्यामुळे ही तफावत दूर करणे गरजेचे आहे.