भाजप सरकारने आणलेले विनाशकारी तीनही प्रकल्प रद्द करणार. जेष्ट नेते पि. चिदंबरम यांचे आश्वासन. गोव्यात निवडणूक केवळ लढण्यासाठी नव्हे तर जिंकण्यासाठी उतरणार. साळ डिचोली येथे काँग्रेस कार्यकर्ता मेळावा.
डिचोली/प्रतिनिधी
गोवा हे एक सांस्कृतिकदृष्टय़ा आपली वेगळी ओळख निर्माण केलेले देशातील महत्वाचे राज्य असून या राज्याचे पर्यावरणीय वैभव, पारंपरिक आणि सांस्कृतिक ठेव नष्ट करण्याच्या दृष्टीने भाजप सरकारने आणलेले तीन मोठे विनाशकारी प्रकल्प काँग्रेस सरकार राज्यात सत्तेवर आल्यानंतर लगेचच रद्द करणार आणि या राज्याची वेगळी ओळख आणि संस्कृती राखून ठेवणार. यावेळी गोवा राज्यात काँग्रेस पक्ष केवळ निवडणूक लढविण्यासाठीच नव्हे तर जिंकण्यासाठी आणि राज्यात सरकार स्थापन करण्यासाठी रिंगणात उतरणार आहे. असे प्रतिपादन काँग्रेसचे जेष्ट नेते तथा माजी केंद्रीय आर्थमंत्री पि. चिदंबरम यांनी साळ डिचोली येथे केले.
डिचोली गट काँग्रेसतर्फे साळ येथील फार्म 33 येथे आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात पि. चिदंबरम बोलत होते. यावेळी व्यासपीठावर गोव्याचे प्रभारी दिनेश गुंडू राव, प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर, महिला अध्यक्षा बिना नाईक, एम. के. शेख, उत्तर गोवा अध्यक्ष विजय भिके, डिचोलीतील नेते मेघश्याम राऊत, गटाध्यक्ष नितीन परब, नझीर बेग, मुस्तफ्फा बेग, डिचोली महिला अध्यक्षा मारीया जोनिटा सौझा आदींची उपस्थिती होती.
या राज्यात सत्ता स्थापन होताना राज्याला भ्रष्टाचारमुक्त सरकार देण्याची ग्वाही दिली होती. परंतु आज या सरकारची आणि राज्याची स्थिति पाहिल्यास हे सरकार सर्वात भ्रष्टाचारी आणि बेजबाबदार सिध्द झाले आहे. राज्याला कोळसा हब करण्याचा घाट या सरकारने रचला असून राज्याची पर्यावरणीय संपन्नता आणि संस्कृती धुळीस मिळविण्याचे कारस्थान आहे. राज्यात महिला असुरक्षित असून कायदा आणि सुव्यवस्था कोलमडली आहे. बेरोजगारी लाढली असून रोजगार देण्यासाठी या सरकारकडे कोणतेच धोरण नाही. आज या राज्यात बदल घडविण्यासाठी काँग्रेस पक्ष पुढे सरसावला असून 2017 साली या पक्षाकडून घडलेली चुक पुन्हा घडणार नाही. गेल्या निवडणुकीत सर्व काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी जिव तोडून कार्य केले. परंतु निवडून आलेले आमदार बेईमान ठरले त्यांनी या पक्षाचा विश्वासघात केला. हि चुक यावेळी घडणार नाही, असे जे÷ नेते पि. चिदंबरम यांनी यावेळी सांगितले.
गोव्याचे प्रभारी दिनेश गुंडू राव यांनी यावेळी आपल्या भाषणात, डिचोलीत काम मोठय़ा प्रमाणात करायचे आहे. भाजपचा बालेकिल्ला आहे. परंतु अशक्मय नाही. सर्वांनी एकजुटीने आणि आत्मयितेने काम करीत जर लोकांना काँग्रेसची धोरणे आणि भविष्यातील कार्य समजावून दिल्यास येणाऱया निवडणुकीत या मतदारसंघात काँग्रेस पक्षाला विजय मिळविणे मुश्कील नाही. भाजप सरकारने राज्याला आर्थिक खाईत नेले असून हे सरकार सर्वात भ्रष्टाचारी सरकार म्हणून सिध्द झालेले आहे. राज्याची परिस्थिती आज बिटक बनली असताना केंद्रातील नरेंद्र मोदी यांनीही देशातील जनतेला देशोधडीला लावले आहे.
डिचोलीतही भाजप विरोधात रोष असल्याचे या बैठकीला उपस्थित असलेल्या कार्यकर्त्यांची उपस्थिती दाखवून देत आहे. यावरूनच येणाऱया निवडणुकीत राज्यात काँग्रेसचे सरकार आणि डिचोलीत काँग्रेसचा आमदार असणार. गेल्या लोकसभा निवडणुकीत आपण उमेदवार म्हणून उतरलो असता काँग्रेस पक्षाला सुमारे सात हजार मते मिळाली होती. त्याच प्रकारचे श्रम जर येत्या निवडणुकीत घेतल्यास या मतदारसंघात काँग्रेसचा आमदार निवडून येण्यास वेळ लागणार नाही. डिचोलीत आलेल्या अनेक आपत्तीच्या वेळी या सरकारने लोकांना आधार दिला नाही. डिचोलीचा आमदार सभापती म्हणून आपले कर्तव्य विसरले असून त्यांना घरी बसविण्याचा निर्धार आज प्रत्येक मतदाराने केला पाहिजे. मुख्यमंत्र्यांनी तर लोकांच्या डोक्मयावर कर्जांचे डोंगर करून ठेवले आहे. बेरोजगारी वाढली असून सध्या नोकऱया देण्याच्या नावावर बेरोजगारांची फसवणूक करण्याच्या तयारीत हे सरकार आहे. असे प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी यावेळी आपल्या भाषणात म्हटले.
गेल्या अनेक वर्षांमध्ये भाजप सरकारने अनेक समस्या निर्माण झालेल्या असून या भाजपला डिचोली मतदारसंघात हरविण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. डिचोलीत जर हा बदल घडला तर संपूर्ण तालुक्मयात आणि राज्यात बदल घडणार आणि काँग्रेस सत्तेवर येणार. गेल्या अनेक वर्षांपासून झालेल्या अन्याय आणि अत्याचाराविरोधात झटून भाजपला हरविल्या शिवाय आता डिचोलीतील काँग्रेस कार्यकर्ते गप्प बसणार नाही. आणि येणाऱया निवडणुकीत राज्यात काँग्रेसचे सरकार असणार आणि त्यात डिचोलीचा आमदार असणार, असे डिचोलीतील नेते मेघश्याम राऊत यांनी म्हटले.
यावेळी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आपले लिचार आणि सल्ले मांडले. सूत्रसंचालन बाला खान गोरी यांनी केले. तर मारिया जोनिटा सौझा यांनी आभार मानले.









