अर्ज भरणारे गावडे ठरले पहिले उमेदवार
ऑनलाईन टीम / गोवा
गेल्या काही दिवसांपूर्वी अपक्ष आमदार गोविंद गावडे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. याच गोविंद गावडे यांनी आपला उमेदवारी अर्ज भरला असून २०२२ च्या गोवा विधानसभा निवडणूकीत अर्ज भरणारे गावडे हे पहीले उमेदवार ठरले आहेत. त्यांनी प्रियोळ मतदारसंघातून उमेदवारी अर्ज भरला आहे.
गोव्यात विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपला धक्के बसत असताना भाजपने सांस्कृतिक मंत्री व अपक्ष आमदार गोविंद गावडे यांना आपल्याकडे खेचत राजकिय स्थिती मजबत करण्याचा पुरेपूर प्रयत्न केला होता. स्थानिक नेत्यांच्या विरोधामुळे या प्रवेशात अडचण निर्माण झाली होती. मात्र त्यांनी भाजप नेतृत्वाच्या मध्यस्थीनंतर ते भाजपमध्ये दाखल झाले होते.
गावडे हे अपक्ष आमदार असले तरी सरकारमध्ये मंत्री होते. भाजपचे प्रदेशाध्यक्ष सदानंदशेट तानवडे यांनी गावडे हे भाजपमध्ये प्रवेश करतील आणि त्यांना प्रियोळ मतदारसंघातून उमेदवारी देण्याची घोषणा केली होती. या घोषणेमुळे स्थानिक नेत्यांकडून गावडेंना तिकिट दिल्यास स्थानिक उमेदवार विरोधात देण्याचा इशारा दिला होता. त्यामूळे आता गावडेंनी आपला उमेदवारी अर्ज भरल्याने स्थानिक नेते यावर काय भुमिका घेणार हे पाहणे औत्सूक्याचं ठरणार आहे.