क्रीडा प्रतिनिधी / मडगाव
गोवा फुटबॉल विकास मंडळाच्या अध्यक्षपदी अर्जुन पुरस्कार विजेते ब्रह्मानंद शंखवाळकर यांनी नियुक्ती शासनाने केली आहे. ब्रह्मानंद शंखवाळकर हे जीएफडीसीच्या कौन्सिल कमिटीचेही अध्यक्षपद भूषविणार आहेत. क्रीडा आणि युवा व्यवहार खात्याने एका आदेशाद्वारे गोवा फुटबॉल विकास मंडळाची घोषणा केली.
या समितीत क्रीडामंत्री बाबू आजगावकर यांचे बंधू डॉ. श्रीकांत आजगावकर यांची उपाध्यक्षपदी नियुक्ती झाली असून माजी मंत्री आणि राष्ट्रीय फुटबॉल आवेर्तान फुर्तादो, अर्जुन पुरस्कार विजेते ब्रुनो कुतिन्हो, लॅक्टर मास्कारेन्हस, संजीव नागवेकर यांना मंडळावर स्थान देण्यात आले आहे.
जीएफडीसी आमसभेसाठी नियुक्त झालेले सदस्य याप्रमाणेः ब्रह्मानंद शंखवाळकर (अध्यक्ष), डॉ. श्रीकांत आजगावकर, आलेक्सो दा कॉस्ता, शांताराम नाईक, संजीव नागवेकर, प्रदीप चोडणकर, आवेर्तान फुर्तादो, कायतान जुझे फर्नांडिस, ब्रुनो कुतिन्हो, लॅक्टर मास्कारेन्हस, कॉलीन वाझ, लॅविनो रिबेलो, वालेंत फर्नांडिस व जॉवितो लोपिश.
जीएफडीसी कौन्सिल समिती ः ब्रह्मानंद शंखवाळकर (अध्यक्ष), डॉ. श्रीकांत आजगावकर (उपाध्यक्ष), आलेक्सो दा कॉस्ता (सदस्य सचिव), आग्नेलो फाँसेका, शांताराम नाईक, स्टॅनिस्लोस डिसोझा, संजीव नागवेकर, प्रदीप चोडणकर, आवेर्तान फुर्तादो, ब्रुनो कुतिन्हा व लॅक्टर मास्कारेन्हस.









