शिवसेना नेते संजय राऊत, राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांची माहिती
पणजी / प्रतिनिधी
गोवा निवडणुकीसाठी आज शिवसेना नेते संजय राऊत आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे वरिष्ठ नेते प्रफूल्ल पटेल यांनी पणजी येथे पत्रकार परिषद घेत या बद्दलची अधिकृत घोषणा केली. यावेळी राष्ट्रवादीचे नेते आणि महाराष्ट्रील महाविकास आघाडीमधील मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्यासह शिवसेना, राष्ट्रवादीचे नेते उपस्थिती होते.
दरम्यान, गोवा विधानसभा निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना एकत्र लढणार असून राष्ट्रीय काँग्रेसला वारंवार प्रस्ताव ठेवूनही काँग्रेसने याबाबत सकारात्मकता न दर्शवता आपली भूमिका स्पष्ट केली नाही. त्यामुळे काँग्रेस शिवाय हे दोन पक्ष एकत्र आले असून ताकदीने निवडणूक लढणार असल्याचे स्पष्ट केले आहे. सध्या कोण किती जागांवर निवडणूक लढवणार हे निश्चित झाले नसले तरी येत्या दोन ते चार दिवसात आपण हा आकडा जाहीर करणार असल्याची भूमिका दोन्ही पक्षांनी सामंजस्याने घेतली असल्याचे यावेळी राष्ट्रवादीचे वरीष्ट नेते प्रफूल्ल पटेल यांनी स्पष्ट केले.
महाराष्ट्राप्रमाणेच गोव्यात ही महाविकास आघाडी एकत्र मात्र राष्ट्रीय काँग्रेस असहमत
तसेच महाराष्ट्र प्रमाणे काँग्रेसला गोवा विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर वारंवार महाविकास आघाडीसाठी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसने मिळून प्रस्ताव ठेवला असताना ही राष्ट्रीय काँग्रेसने वेगळे लढण्याची घेतलेली भूमिका कायम ठेवली त्यामुळे काँग्रेस शिवाय सध्या राष्ट्रवादी आणि शिवसेना गोवा विधानसभा निवडणूक लढणार आहे. असून 40 जागा लढणार नसलो तरी जेवढ्या जागा लढू त्या पूर्ण जिंकू असा विश्वास यावेळी खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केला.