प्रतिनिधी / फोंडा
गोवा राज्य सहकारी दुध उत्पादक संघ म्हणजेच गोवा डेअरीच्या खरेदी विभागात नोव्हे. 2020 ते मार्च 2021 या कालावधीत अनेक गैरव्यवहार झाल्याचा संशय गोवा डेअरीचे माजी अध्यक्ष राजेश फळदेसाई यांनी व्यक्त केला आहे. यासंबंधी डेअरीच्या व्यवस्थापकीय संचालक म्हणून जबाबदारी सांभाळणारे डॉ. अनिल फडते यांची चौकशी व्हावी अशी लेखी तक्रार त्यांनी डेअरीच्या त्रिसदस्यीय समितीकडे दाखल केली आहे.
गोवा डेअरीच्या खरेदी विभागात काम करणाऱया एका अधिकाऱयाचा ताबा काढला, मात्र त्या विभागाचा ताबा अन्य सक्षम अधिकाऱयाकडे न देता आपण स्वतःकडे ठेवत व्यवस्थापकीय संचालक डॉ. अनिल फडते यांनी कारभार हाकण्यामागील कारण स्पष्ट करावे असे सुचविले आहे. तसेच या कालावधीत अनेक गैरप्रकार घडल्याचा दावा फळदेसाई यांनी केला असून कच्चा मालाची खरेदीसाठी निविदा प्रक्रियानुसार झालेली नाही, सर्वात कमी दर नोंदविलेल्या कंत्राटदाराला मंजूरी न देता अन्य कुणाला देण्यात आल्याचा आरोप केला आहे. तसेच यासंबंधी त्रिसदस्यीय समितीचे मान्यता घेतली नसल्याचे म्हटले आहे. त्यामुळे त्रिसदस्यीय समितीने व्यवस्थापकीय संचालकाविरोधात चौकशीचे आदेश द्यावे अशी मागणी केली आहे. याप्रकरणी सदोष चौकशीसाठी ऑडीटरची नेमणूक करावी असे तक्रारीत म्हटले आहे.
दरम्यान याप्रकरणी डेअरीच्या त्रिसदस्यीय समितीचे अध्य़क्ष दुर्गेश शिरोडकर यांच्यांशी संपर्क केला असता तो होऊ शकला नाही. त्रिसदस्यीय समिती सदरप्रकरणी कोणता निर्णय घेतात यावर दुध उत्पादकांचे लक्ष लागून राहिले आहे.
‘त्या’ अधिकाऱयाचा मनमानी कारभार
डेअरीत सद्या वेटरनरी प्रमुख म्हणून कार्यभार सांभळणाऱया ‘त्या’ अधिकाऱयाची मनमानी कारभार चाललेला आहे. दुध उत्पादकांच्या सेवसाठी कोलवाळे येथे बदली करण्यात आलेल्य़ा वेटरनरी डॉक्टराची अजूनही कचेरीत बसवून ठेवण्यात येत आहे. त्रिसदस्यीय समितीने तातडीने घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी करण्याचे सोडून समितीच्या निर्णयाकडे डोळेझाक करण्याचा पवित्रा त्या अधिकाऱयाने घेतलेला आहे. यासंबंधी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यानी लक्ष घालावे









