वर्षभरातील आकडेवारीचा समावेश – दीर्घ कालावधीसाठी गुंतवणूक फायद्याची
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
ग्राहक सध्याच्या घडीला गोल्ड म्युच्युअल फंडच्या माध्यमातून सोन्यामध्ये गुंतवणूक करत आहेत. कारण सदरचा प्लॅटफॉर्म हा दीर्घ कालावधीसाठी विश्वासपूर्ण मानला जात आहे. यामध्ये गोल्ड म्युच्युअल फंडने मागील वर्षभरात 13 टक्क्यांचा परतावा दिलेला आहे.
यामध्ये गोल्ड म्युच्युअल फंड, गोल्ड इटीएफचा एक प्रकार आहे. यामध्ये अशा योजनांच्या माध्यमातून मुख्य स्वरुपात गोल्ड इटीएफमध्ये गुंतवणूक केली जाते. गोल्ड म्युच्युअल फंड थेट सोन्यामध्ये गुंतवणूक केली न जाता त्याच्यात अप्रत्यक्ष स्वरुपात गुंतवणूक केली जाते.
गोल्ड फंडमधील 3 वर्षापेक्षा अधिकची गुंतवणूक दीर्घ काळासाठी योग्य मानली जाते. यामधील लाभाला लाँग टर्म कॅपिटल गेन्स म्हटले(एलटीसीजी) जाते. सोन्यावर एलटीसीजी वर इंडेक्सेशन बेनिफिट सोबत 20 टक्क्यांचा दरातून कर आकारला जातो.
गोल्ड म्युच्युअल फंडस (टक्क्यांमध्ये)
फंडचे नाव वर्षातील तीन वर्षातील पाच वर्षांतील
ऍक्सिस गोल्ड…. 13.1………. 13.6…….. 7.8
एसबीआय गोल्ड 12.8………. 12.9…….. 7.7
एचडीएफसी गोल्ड……………. 12.5…….. 12.8 7.8
निप्पॉन इंडिया गोल्ड ……….. 12.0…….. 12.5 7.5
कोटक गोल्ड 11.3 13.5 8.0









