मुंबई
बांधकाम क्षेत्रातील कंपनी गोदरेज प्रॉपर्टीज लिमिटेडने मुंबईमध्ये नुकतीच एक जागा रहिवासी बांधकाम प्रकल्पाच्या विकासासाठी खरेदी केली आहे. 1.5 एकर इतकी सानपाडा, नवी मुंबईतील जागा गोदरेज प्रॉपर्टीजने नुकतीच 166 कोटी रुपयांना खरेदी केली असल्याचे समजते. सदरच्या जागेवर कंपनी रहिवासी बांधकाम प्रकल्प राबवणार आहे. या प्लॉटपैकी 4 लाख चौरस फूट जागेत बांधकाम प्रकल्पाचे काम केले जाणार असल्याचे कंपनीने सांगितले. कंपनीचे मुंबईसोबत पुणे, बेंगळूर, दिल्ली-एनसीआर या शहरांमध्ये प्रकल्प कार्यरत आहेत. डिसेंबर 2020 ला संपलेल्या तिमाहीअखेर कंपनीच्या निव्वळ नफ्यामध्ये 69 टक्के घट नोंदवली गेली आहे.









