6 कारखान्यांसह ब वर्गातील 1074 संस्थांचा समावेश
प्रतिनिधी / कोल्हापूर
कोरोनामुळे वर्षभर लांबणीवर पडलेल्या राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुकीचे बिगुल मंगळवारी वाजले. 250 पेक्षा कमी सभासद असलेल्या गृहनिर्माण संस्था वगळून अन्य सहकारी संस्थांच्या निवडणुका घेण्यात याव्यात, असे आदेश राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाचे सचिव यशवंत गिरी यांनी काढले आहेत. सोमवार 18 पासून ही प्रक्रिया सुरु होणार आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील गोकुळ, जिल्हा बँक, राजारामसह पाच साखर कारखाने, कोजिमाशि, प्राथमिक शिक्षक, गर्व्हमेंट सर्व्हंट बँक, जिल्हा परिषद सोसायटीसह अन्य 1074 संस्थांच्या निवडणुका होणार आहेत.
दरम्यान न्यायालयात गेलेल्या सहकारी संस्थांचा निवडणुकांचा कार्यक्रम प्रस्ताव सादर करण्यात यावा, असे आदेश राज्य सहकारी संस्था निवडणूक प्राधिकरणाचे सचिव यशवंत गिरी यांनी काढले आहेत. उच्च न्यायालयाने निवडणूक घेण्याचे आदेश दिलेल्या 38 संस्थांबाबत हे आदेश दिले होते. त्याच वेळी याचा आधार घेऊन अन्य संस्थांच्या निवडणुकीवर मंगळवारी शिक्कामोर्तब झाले.