प्रतिनिधी / कोल्हापूर
कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ (गोकुळ) चा मंगळवार 16 रोजी 58 वा वर्धापन दिन साजरा होत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा सोहळा साधेपनाने साजरा करण्यात येणार आहे. चेअरमन रविंद्र आपटे यांनी जिल्ह्यातील दूध उत्पादकांना या निमित्ताने शुभेच्छा दिल्या आहेत.
अतिशय खडतर परिस्थिती संस्थापक कै. आनंदराव पाटील चुयेकर यांनी 16 मार्च 1963 ला गोकुळची मूहुर्तमेढ रोवली. आज देशाच्या सिमा ओलांडून गोकुळचा नावलौकिक झाला आहे. जर्मन येथील संस्थेने नुकताच संघाचा सन्मान केला. 58 वर्षात अनेक टप्पे पार करीत 20 लाख लिटर दूध संकलन करण्याचे ध्येय ठेऊन संघ कार्यरत झाला आहे. मंगळवारी जाहीर कार्यक्रमांना फाटा देण्यात आला आहे. तथापि प्राथनिधीक स्वरुपात काही वितरक, गोकुळ श्री स्पर्धेत विजेत्यांचा गौरव करण्यात येणार आहे.
दूध उत्पादकांना अशीच निष्ठा कायम ठेवावी
जिल्ह्यातील दूध उत्पादकांच्या घामावर हा संघ डौलाने उभा आहे. आम्ही फक्त विश्वस्त आहोत. संघाच्या आजपर्यंतच विकासात उत्पादकांचे मोलाचे सहकार्य आहे. वर्धापन दिनानिमित्त सर्व दूध उत्पादकांना शुभेच्छा देतो.
रविंद्र आपटे, चेअरमन
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









