पालकमंत्री सतेज पाटील यांचा सत्ताधाऱ्यांना टोला
प्रतिनिधी/कोल्हापूर
सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाचा सत्ताधाऱ्यांनी मान राखावा हा लोकशाहीचा विजय आहे. त्यामुळे सर्व नियम पाळून निवडणूक होणार आहे. मात्र आता स्थगिती मिळवण्यासाठी सत्ताधारी गटाने जागतिक न्यायालयात जाऊ नये न्यायालयाच्या निर्णयाचा आदर करावा असा टोला पालकमंत्री सतेज पाटील यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत लगावला. यावेळी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, गोकुळचे माजी चेअरमन विश्वास पाटील, माजी संचालक बाबासाहेब चौगुले उपस्थित होते.
यावेळी पालकमंत्री पाटील म्हणाले की, आपल्या देशाने लोकशाहीचा स्वीकार केलेला आहे. लोकशाहीमध्ये निवडणुकीला महत्त्वाचे स्थान आहे. गोकुळ मध्येही निवडणूक व्हावी हीच आमची भूमिका होती. न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार मतदान केंद्राची संख्या दुप्पट करून निवडणूक होणार आहे. पंढरपूर निवडणूक ही सुरळीत पार पडली आहे. याचा दाखला देत न्यायालयाने हा निर्णय दिला असल्याचे पालकमंत्री पाटील यांनी शेवटी सांगितले.
कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाची निवडणूक स्थगित करण्यास सर्वोच्च न्यायालयाने आज, मंगळवारी नकार दिला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गोकुळची निवडणूक स्थगित करावी या मागणीसाठी सत्ताधाऱ्यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. मात्र न्यायालयाने आज दिलेल्या आदेशामुळे गोकुळ निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









