ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधी पक्षातील राज्यसभेच्या 12 खासदारांचे निलंबन करण्यात आले आहे. या 12 खासदारांवर संपूर्ण हिवाळी अधिवेशनासाठी ही कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये काँग्रेसचे 6, टीएमसी आणि शिवसेनेचे प्रत्येकी दोन तर सीपीएम आणि सीपीआयच्या प्रत्येकी एका खासदाराचा समावेश आहे.
राज्यसभेच्या 254 व्या अधिवेशनात 11 ऑगस्ट 2021 ला सभागृहामध्ये गैरवर्तवणूक करुन कामकाजामध्ये अडथळा आणल्याप्रकरणी हे निलंबन करण्यात आले आहे. राज्यसभेच्या सदस्यांच्या वर्तवणूकीसंदर्भातील नियमांमधील नियम क्रमांक 256 नुसार ही कारवाई करण्यात आली असून, त्यामध्ये फुलो देव निताम, छाया वर्मा, रिपून बोरा, राजमणी पटेल, सय्यद नसीर हुसैन आणि अखिलेश प्रसाद सिंग या काँग्रेसच्या सहा खासदारांचा समावेश आहे.
तर डोला सेन आणि शांता छेत्री (तृणमूल काँगेस), प्रियंका चतुर्वेदी आणि
अनिल देसाई (शिवसेना) तसेच बिनोय विश्मव (सीपीआय) आणि एल्लामारम करीम या सीपीएमच्या खासदाराचा समावेश आहे.