ऑनलाईन टीम / देहरादून :
उत्तराखंडात कोरोना रुग्ण वाढण्याची संख्या आणि मृत्यूचे प्रमाण कमी होताना दिसत आहे. मागील 6 महिन्यानंतर गेल्या 24 तासात सर्वात कमी रुग्णांची नोंद झाली आहे. गेल्या 24 तासात तपासण्यात आलेल्या 10,499 रुग्णांपैकी केवळ 54 नव्या रुग्णांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. तर 02 जणांनी आपला जीव गमावला आहे. त्यामुळे प्रदेशातील एकूण संख्या 95,640 इतकी आहे.
आरोग्य विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, काल 10, 445 नमुने निगेटिव्ह आले. देहरादूनमध्ये 15 नवे रुग्ण आढळून आले. हरिद्वार 10, नैनिताल 23, उधमसिंह नगर 02 आणि पिथौरागड, चंपावत, टिहरी आणि चमोलीमध्ये प्रत्येकी एक रुग्ण आढळला. अल्मोडा, बागेश्र्वर, उत्तरकाशी, पौडी गडवाल आणि रुद्रप्रयाग जिल्ह्यात एकही रुग्ण आढळला नाही.
दरम्यान, प्रदेशात आतापर्यंत 1631 रुग्णांनी आपला जीव गमावला आहे. तर कालच्या दिवसात 57 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. तर आता पर्यंत 90,967 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर सद्य स्थितीत 1725 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.









