वृत्तसंस्था / नवी दिल्ली
सॅमसंगने भारतीय बाजारामध्ये आपला लेटेस्ट बजट स्मार्टफोन गॅलेक्सी एम 12 सादर केला आहे. सदरच्या स्मार्टफोनमध्ये 6000 एमएएच क्षमतेची बॅटरी असून हा फोन ऍक्सीनोस 850 प्रोसेसरयुक्त आहे. याच्या व्यतिरिक्त बजट स्मार्टफोनमध्ये चार रियर कॅमेरे मिळणार असल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे.
गॅलेक्सी एम 12 चे भारतामध्ये दोन मॉडेल सादर केले आहेत. बेस मॉडेलमध्ये 4 जीबी रॅम आणि 64 जीबी स्टोरेज राहणार असून याची किमत 10,999 रुपये आहे. दुसरे मॉडेल 6 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज राहणार असून यांची किमत 13,499 रुपये राहणार असल्याचे कंपनीने सांगितले आहे.
फोन अट्रक्टिव ब्लॅक, एलिगेंट ब्लू आणि ट्रेंडी एमरल्ड ग्रीन कलरमध्ये उपलब्ध होणार आहे. पहिली विक्री 18 मार्च रोजी सुरु होणार असून ऍमेझॉन, सॅमसंग डॉट कॉम आणि रिटेल स्टोरमध्ये हा स्मार्टफोन उपलब्ध होणार आहे.
गॅलेक्सी एम 12 मधील अन्य सुविधा
नॅनो सिम, 6.5 इंच एचडी प्लस टीएफटी,ऍक्सीनोस 850 प्रोसेसरलेस,चार रियर कॅमेरे असून यामध्ये एफ/2.0 अपर्चरसोबत
48 एमपी कॅमेरा,6000 एमएएच क्षमतेची बॅटरी 4जी एलटीई, वायफाय 802.11 बी/जी/एन, ब्लूटय़ूथ 5.0









