संगीताच्या तालावर घेतला खाद्यपदार्थांचा आस्वाद

प्रतिनिधी /बेळगाव
गॅरेज कॅफेला तरुणाईचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे. गॅरेज कॅफेमध्ये सुरू असणारे कलाप्रदर्शन व पाश्चिमात्य खाद्य महोत्सवातील पदार्थांचा आस्वाद घेत आहेत. सोमवारी व्हॅलेंटाईन डे चे औचित्य साधून सुमधूर अशा गीतांचे लाईव्ह सादरीकरण करण्यात आले. या गीतांच्या तालावर तरुणाईने खाद्य पदार्थांचा आस्वाद घेतला.
गॅरेज कॅफेमध्ये चित्र तसेच इतर कला प्रदर्शन मांडण्यात आले आहेत. विविध थीमद्वारे युवकांनी चित्रे काढली आहेत. वाणेश्री कामते, कमला घुमास्ते यासह इतर तरुणांनी आपली चित्रे या ठिकाणी प्रदर्शनात मांडली आहेत. योजन शंभुचे या तरुणीने स्वतः बनविलेली चॉकलेट प्रदर्शनात मांडली आहेत. हे प्रदर्शन पाहण्यासाठी तरुणाईंची गर्दी होत आहे.
संगीताच्या तालावर व्हॅलेंटाईन डे
हॅलेंटाईन डे विषयीची तरुणांमधील पेझ पाहून गॅरेज कॅफेमध्ये विशेष संगीत कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. गायक कलाकारांनी हिंदीमधील एकाहून एक सरस अशी गीते सादर करून उपस्थित खवय्यांची वाहवा मिळविली. संगीतासोबतच चमचमीत अशा पाश्चिमात्य खाद्यपदार्थांचा आस्वाद घेण्यात आला.









