उद्योजक गोविंद फडके यांचे प्रतिपादन : आविष्कार उत्सवाला प्रारंभ
प्रतिनिधी /बेळगाव
बेळगावमधील महिला सक्षम व कार्यशील असून येथील अनेक संस्थांचे नेतृत्व महिला करत आहेत. ‘आविष्कार’ उद्यमशील महिला ही त्यापैकीच एक आहे. ज्यामुळे महिलांना गृहोद्योग करणाऱया महिलांना व्यासपीठ मिळते आणि बाजारपेठेचे त्यांना आकलन होते, असे मत उद्योजक गोविंद फडके यांनी व्यक्त केले.
आविष्कार उद्यमशील संस्थेतर्फे मराठा मंदिर येथे आविष्कार उत्सवाला प्रारंभ झाला आहे. रविवारपर्यंत चालणाऱया या उत्सवाचे उद्घाटन शुक्रवारी गोविंद फडके यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. त्यांनी सर्व स्टॉलना भेट देवून सर्वांना शुभेच्छा दिल्या.
प्रारंभी गोविंद फडके यांच्या हस्ते फीत सोडवून व दीपप्रज्वलन करुन उत्सवाचे उद्घाटन करण्यात आले. आविष्कारच्या अध्यक्षा सुलभा खानोलकर यांनी लॉकडाऊनमुळे गतवषी उत्सव होवू शकला नाही. परंतु या काळात अनेक गोष्टी महिलांनी शिकून घेतल्या. कोरोनामुळे बहुसंख्य ठिकाणी स्त्राrयांच्या हाती नेतृत्व आले, असे सांगून सदर संस्था ना नफा ना तोटा तत्वावर कार्यरत असल्याचे सांगितले. शीला कणबरकर यांनी पाहुण्यांची ओळख करुन देवून सुत्रसंचालन केले. याप्रसंगी सर्व संचालिका उपस्थित होत्या.
या उत्सवात स्थानिक महिलांनी तयार केलेल्या गृह सजावटीच्या वस्तु, खाद्य पदार्थ, वस्त्र प्रावरणे, दागिने, बेडसीटस्, पर्स तसेच दिवाळीसाठी लागणाऱया वस्तुंचा समावेश आहे. रविवारपर्यंत सकाळी 11 ते रात्री 8 यावेळेत सुरू राहणार आहे.









