प्रतिनिधी /सातारा :
जिल्हा पोलीस मुख्यालयाच्या वतीने कोरोना काळात आपले कर्तव्य बजाविणारे पोलीस अधिकारी, पोलीस मित्र आणि विविध सामाजिक संस्था व संघटनांचा यथोचित गौरव प्रमुख पाहूणे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या हस्ते करण्यात आला. तेंव्हा व्यासपीठावर सातारा जिह्याचे खासदार श्रीनिवास पाटील, आमदार शशिकांत शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत गौरव सोहळा संपन्न झाला. यावेळी पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, अतिरिक्त जिल्हा पोलीस अधीक्षक धीरज पाटील, पोलीस उपनिरीक्षक गणेश वाघ आदी उपस्थित होते.यामध्ये पोलीस मिञ संघ सातारा जिह्याचे अध्यक्ष शुभम भोसले व जिल्हा सचिव कृणाल मोरे यांनी कोरोनाग्रस्त काळामध्ये पोलीस प्रशासनाबरोबर उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल त्यांचा गौरव करण्यात आला.









