प्रतिनिधी /काणकोण
मडगाव-कारवार मार्गावरील गुळे परिसर सध्या अपघातप्रवण क्षेत्र बनले असून मागच्या दोन दिवसांत दोन मालवाहू ट्रक येथील रस्त्यावर कलंडपे आहेत. करमल घाट उतरणीवर कारवारच्या दिशेने जाणाऱया वाहनांपैकी एक वाहन 8 रोजी, तर दुसरे मालवाहू वाहन 9 रोजी या ठिकाणी अपघातग्रस्त झाले. या अपघातांमागील नेमके कारण समजू शकले नाही, मात्र हे दोन्ही अपघात सदोष रस्त्यामुळे झाले असल्याचा दावा होत आहे. दोन्ही अपघातांत सुदैवाने मनुष्यहानी टळली असल्याची माहिती काणकोणच्या पोलीस स्थानकावरून देण्यात आली.









