वृत्तसंस्था/ बोगोटा
येथे सुरु असलेल्या विश्व वेटलिफ्टींग स्पर्धेत पुरुषांच्या विभागात भारताच वेटलिफ्टर गुरदीपसिंग 109 किलोवरील वजन गटात 21 व्या स्थानावर समाधान मानावे लागले.
27 वर्षीय गुरदीपसिंगने यापूर्वी बर्मिंगहॅम राष्ट्रकूल क्रीडा स्पर्धेत कांस्यपदक मिळविले होते. त्याने विश्व वेटलिफ्टींग स्पर्धेत क गटात स्नॅचमध्ये 145 किलो तर क्लिन आणि जर्कमध्ये 205 असे एकूण 350 किलो वजन उचलले. त्याला 21 व्या स्थान मिळाले. या स्पर्धेमध्ये भारताच्या पुरुष स्पर्धकांकडून निराशा झाली. मात्र भारताच्या महिला वेटलिफ्टर्सनी 2 पदके मिळविली. मीराबाई चानूने 49 किलो वजन गटात क्लिन आणि जर्क तसेच एकूण गटात अशी 2 रौप्यपदके मिळविली. भारताच्या इतर वेटलिफ्टर्सना या स्पर्धेत चांगली कामगिरी करता आली नाही.









