पोलीस उपअधिक्षक आंचल दलाल
प्रतिनिधी/ सातारा
कोणत्याही पदावर महिला अधिकारी नियुक्त झाल्यानंतर सर्वच महिलांसाठी ही अभिमानाची बाब असते. मी हजर होण्याआधीच महिला अधिकारी नियुक्त होणार म्हणून अनेकांना आनंद झाला. आता माझी जबाबदारी वाढली आहे. शनिवारी मी चार्ज घेतला आहे. साताऱयातील गुन्हेगारीला आळा बसवण्यासाठी मी ठोस पावले उचलणार आहे. असे मत पोलीस उपअधीक्षक आंचल दलाल यांनी तरूण भारतशी बोलताना व्यक्त केले.
यावेळी दलाल म्हणाल्या, महिला सुरक्षितेवर लक्ष केंद्रीत करणार आहे. सातारकरांनी त्यांना असणाऱया समस्या मला न घाबरता सांगाव्यात मी त्या तात्काळ सोडवण्यात प्राधान्य देईन. सर्व कर्मचारी वर्ग यांना सोबत घेवून काम करेन त्यांनाही माझ्या कामाची पद्धत लवकर समजेल. जिल्हाधिकारी शेखर सिंह हे माझे बंधु आहेत. भावाबरोबर एकाच जिह्यात काम करण्याची संधी मला पहिल्यांदा मिळाली आहे. यांचा आनंद जास्त आहे.









