प्रतिनिधी /पणजी
‘गुणीसोबत शिकूया – आपण कुठे आहोत?’ या पुस्तकाचे गोमंत मराठी अकादमीचे अध्यक्ष अनिल सामंत व ज्ञानप्रसारक विद्यालयाचे मुख्याध्यापक गुरुदास पालकर यांच्या हस्ते नुकतेच प्रकाशन करण्यात आले.
चंद्रनाथ अपार्टमेंट म्हापसा, येथे रिडिंग प्लॅनेट या पुस्तकालयामध्ये या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी गोमंत मराठी अकादमीचे बार्देश प्रमुख, बबन पंडित, कोंकणी साहित्यक सुदेश भोबे उपस्थित होते. प्रज्ञा वझे-घारपुरे यांनी या पुस्तकाचे लेखन केले आहे. ‘घरी येणारी माणसं’ हे या मालिकेतील पहिले पुस्तक ‘गुणीसोबत शिकूया- घरी येणारी माणसं’ हे पहिले पुस्तक तर ‘गुणीसोबत शिकूया – आपण कुठे आहोत?’ हे दुसरे पुस्तक आहे.









