प्रतिनिधी / पन्हाळा
पन्हाळा पायथ्याशी गुडे येथील वकील पुत्र सिद्धेश सुरेश कदम या युवकावर बलिकेचा विनयभंग केल्या प्रकरणी आज मंगळवारी बालकांचा लैंगिक अत्याचार प्रतिबंध(पोस्को) कायद्यांतर्गत दुसरा गुन्हा दाखल झाला. सोमवार दाखल गुन्हा प्रकरणी मंगळवारी कोल्हापूर येथील विशेष न्यायालयात व्हीसी द्वारे हजर केले असता, येथील न्यायालयाने सिद्धेश कदम यास दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली, अशी माहिती पन्हाळा पोलिसांनी दिली.
या युवकाने गावातील अनेख महिला व बलिकेचा विनयभंग केल्याच्या तक्रारी पुढे येऊ लागल्या आहेत. यामध्ये बालिकेचा समावेश जास्त आहे. सिद्धेश बद्दल गावात संतप्त प्रतिक्रिया उमटत आहे. दुसऱ्या दाखल तक्रारीत आठ वर्षीय बालिकेस लँपटॉप मधील आशिलील व्हिडीओ दाखवून लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले आहे.
या युवकाचे वडील वकील असल्याने पीडित व्यक्ती तक्रार देण्यास धजत न्हवते. मात्र सोमवारी एक तक्रार दाखल होताच लगेच दुसरी तक्रार दाखल झाली आहे. तर पोलीस कोठडी चौकशीतुन आणखी प्रकार उघड होण्याची शक्यता आहे. घडल्या प्रकार बाबत घटनास्थळी पन्हाळा पोलीस निरीक्षक अरविंद काळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक शैलेजा पाटील या पंचनामा करुन पुढील तपास करत आहेत.









