प्रतिनिधी /बेळगाव
गुडस (ता. हुक्केरी) ग्राम पंचायतीचा क्लार्क लाच घेताना एसीबीच्या जाळय़ात अडकला आहे. सोमवारी ही कारवाई करण्यात आली असून 7 हजार 400 रुपये स्वीकारताना त्याला रंगेहाथ पकडण्यात आले आहे.
पंचायतीमध्ये बिल कलेक्टर म्हणून काम करणारा सिद्धगौडा बसवाणी नेरली हा जाळय़ात अडकला आहे. वारसा दाखल करण्यासाठी भीमाप्पा कलकुटगी यांच्याकडून त्याने 7 हजार 400 रुपये लाच मागितली होती. त्यामुळे भीमाप्पा यांनी एसीबीकडे तक्रार केली होती. एसीबीचे पोलीस प्रमुख बी. एस. न्यामगौडर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक करुणाकर शेट्टी, पोलीस निरीक्षक अडविश गुदीगोप्प, सुनीलकुमार व त्यांच्या सहकाऱयांनी ही कारवाई केली आहे. एसीबीने केलेल्या कारवाईमुळे खळबळ माजली आहे.









