ऑनलाईन टीम / अहमदाबाद :
गुजरातमधील खेडा शहरात पोलीस स्टेशन परिसरात शनिवारी रात्री भीषण आग लागली. या आगीत तब्बल 25 वाहने जळून खाक झाली आहेत. सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही. आगीचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.
स्थानिकांनी आगीची माहिती देताच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. मात्र, आग एवढी भीषण होती की, काही क्षणात परिसरातील वाहनांनी पेट घेतला. जवळपास 25 वाहने आगीत जळून खाक झाली. या वाहनांमध्ये दुचाकी, ऑटोरिक्षा आणि कारचा समावेश आहे. सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही. पोलीस अधिक तपास करत आहेत.