नवी दिल्ली :
भारतात यावर्षी फक्त गुगल पिक्सल एक्सएल हा स्मार्टफोन लाँच होणार आहे. म्हणजेच याचाच अर्थ कोणताही छोटय़ा स्क्रीनचा अन्य फोन यंदा बाजारात येणार नाही, हे स्पष्ट आहे. पिक्सल एक्सएल हा उत्तम हार्डवेअरनेयुक्त असून विशेष म्हणजे या फोनची किंमत आधीच्या तुलनेत 100 डॉलरने कमी करण्यात येणार असल्याचा दिलासाही कंपनीने दिला आहे. याची किंमत 699 डॉलरने सुरू होणार आहे. या फोनला 8 जीबी रॅम सपोर्ट असून आधुनिक पंच होल डिस्प्लेची सुविधाही यात पिक्सल 4 एप्रमाणे असेल, असे कंपनीने म्हटले आहे. आयपी वॉटर रेटिंग आणि वायरलेस चार्जिंग सपोर्टसह हा फोन येण्याची शक्यता सांगितली जात आहे.








