प्रतिनिधी /म्हापसा
वांसियोवाडो गिरी येथील श्री शिवनाथ स्वामी महाराजांची (शिवराम पार्सेकर) यांची 52 वी पुण्यतिथी शुक्रवार दि. 18 रोजी साजरी करण्यात येणार आहे. यानिमित्त सकाळी यज्ञयाग विधी, कुळस्वामी पूजा, स्वामी पादुका अभिषेक, दु. 12.30 वा. आरती, तीर्थप्रसाद, सायं. डॉ. राजू पेडणेकर आणि साथी कलाकारांचे भजन होईल. शांडिक स्वामी (गोकर्ण क्षेत्र) यांचे परमशिष्य शंकर स्वामी (मुळचे सातारा) यांनी शंभर वर्षापूर्वी मोरजी येथे दत्तमंदिराची स्थापना केली. त्यांचे परमशिष्य शिवनाथ स्वामी महाराज यांची पुण्यतिथी साजरी होणार आहे. भाविकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन रुद्राजी पार्सेकर यांनी केले आहे.









