प्रतिनिधी / कसबा बीड
कसबा बीड तालुका करवीर येथे कोरोनाव्हायरस पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासन शिस्तीप्रमाणे कसबा बीड व सावरवाडी गावांमध्ये कसबा बीड पॅटर्न सुरू केला आहे. 22 मार्च पासून कोरोनाव्हायरस संदर्भात संपूर्ण देश लॉक डाऊन केला आहे. 14 एप्रिल पासून त्यामध्ये आणखी वाढ करून पोलीस प्रशासनाने शहरांमध्ये येणारे सर्व रस्ते लॉक करून अत्यावशक वगळता कोणालाही शहरात प्रवेश दिला जात नाही. त्याच पद्धतीने करवीर तालुक्यातील पश्चिम भागात कसबा बीड व सावरवाडी गावांमध्ये कसबा बीड पॅटर्न सुरू केला आहे. गावातील युवकांनी एकत्र येऊन निस्वार्थी व विनामोबदला गावासाठी काम करायचे ठरवले.
जेणेकरून जगामध्ये हाहाकार माजवलेल्या कोरोना रोगापासून आपल्या गावाला सुरक्षित ठेवायचे. त्यासाठी ग्रामपंचायत सरपंच, पोलीस पाटील, ग्रामसेवक, तलाठी, व नेतेमंडळी यांनी एकत्र येऊन ग्रामसुरक्षा दलाची कमिटी स्थापन केली. त्यामध्ये तीन शिफ्टमध्ये काम करायचे ठरवले. त्यासाठी चार टीम बनवल्या. तीन दिवसानंतर एका टीमला कॉमन सुट्टी देण्यात येईल. तीन ठिकाणी केंट उभारून प्रत्येक केंट ला चार-पाच युवक अशा पद्धतीने काम सुरु केले आहे. यामुळे गावात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीवर रात्रंदिवस बारीक नजर ठेवता येईल व बाहेर गावातून आलेली व्यक्ती ती कोणत्या कारणासाठी आलेली आहे ? ती गावातून बाहेर गेली का नाही ? यावंर पोलीस प्रशासनात सारखे लक्ष राहील.
या काम करण्याच्या पद्धतीला कसबा बीड पॅटर्न असे नाव ग्रामपंचायतमार्फत देण्यात आले आहे. त्यांनी या केलेल्या कामाचे गावकऱ्यांच्याकडून समाधान व्यक्त होत आहे. अशाच प्रकारे बाकीच्या गावात सुद्धा प्लॅनिंग करून आपले गाव कोरोना व्हायरस या संसर्गजन्य रोगांपासून बचाव करावा. हाच उद्देश असल्याचे कोरोना कमिटी ग्रामसुरक्षा दलामार्फत सांगण्यात आले.