शेतकरी स्वतःच्या गायींबाबत किती संवेदनशील असतो याचे उत्कृष्ट उदाहरण स्वीत्झर्लंडमध्ये दिसून आले आहे. येथली काही गायींना एअरलिफ्ट करून पर्वतावरून सपाट प्रदेशात आणले गेले आहे. गायींचे हे एअरलिफ्टिंग शेतकऱयांनीच करविले आहे. या गायींना पर्वतांवरून एअरलिफ्ट करून गवताळ मैदानात आणले गेले.
या गायी उन्हाळय़ाच्या दिवसांमध्ये पर्वतांवर चरण्यासाठी जातात, त्यानंतर हिवाळय़ात त्यांना परत मैदानी भागात आणले जाते. पर्वतांवर काही गायी आजारी पडल्या किंवा जखमी झाल्या होत्या. रस्ता नसल्याने त्यांना वाहनाद्वारे मैदानी भागात आणणे शक्य नव्हते. याचमुळे शेतकऱयांनी त्यांना हेलिकॉप्टरद्वारे एअरलिफ्ट करण्याचा निर्णय घेतला.
खबरदारीसह एअरलिफ्टिंग
एअरलिफ्टिंगदरम्यान गायी घाबरू नयेत म्हणून त्यांना चांगल्याप्रकारे केबल आणि दोरखंडाने बांधण्यात आले. काही गायी जखमी झाल्या होत्या आणि आम्ही त्यांना खाली पायी चालत आणू इच्छित नव्हतो असे शेतकरी जोनास अर्नोल्ड यांनी म्हटले आहे. ही प्रक्रिया काही तासाचत पूर्ण झाली. तोपर्यंत तंदुरुस्त गायी स्वतः चालून पर्वतावरून खाली आल्या. गायींच्या कळपात सुमारे 1 हजार गायी होत्या, यातील सुमारे 10 गायींना एअरलिफ्ट करून मैदानी भागात आणले गेले.









