सुळगा (ये) ग्रामस्थांचे पिडीओंना निवेदन
प्रतिनिधी /येळ्ळूर
गायरान जागेमध्ये कचरा डेपो करण्याचा जो घाट घालण्यात आला आहे तो चुकीचा आहे. कोणत्याही परिस्थितीत त्या ठिकाणी कचरा डेपो होवू नये. कारण सदर गायरान जमीन ही जनावरांना चरण्यासाठी आवश्यक आहे. तेंव्हा कोणत्याही परिस्थितीत या ठिकाणी कचरा डेपो करु नये, अशा मागणीचे निवेदन सुळगे (ये) ग्रामस्थांनी ग्राम पंचायत पिडीओंना दिले आहे.
सुळगे गावचा दुग्ध व्यवसाय हा मोठा धंदा आहे. प्रत्येक शेतकऱयाने जनावरे पाळली आहेत. तेंव्हा जनावरांना चरण्यासाठी गायरान जागा आवश्यक आहे. तेंव्हा या ठिकाणी कचरा डेपो करु नये, अशी मागणी करण्यात आली. पिडीओ दुर्गाप्पा ताशिलदार यांना निवेदन देण्यात आले. यावेळी बी. बी. पाटील, प्रभाकर नावगेकर, पी. एन. पाटील, परशराम कंग्राळकर, गणपती यादव, कृष्णा बाळेकुंद्री, गणपती कुगजी, महादेव येळ्ळूरकर, प्रकाश जाधव यांच्यासह बहुसंख्य नागरिक उपस्थित होते.









