उचगाव / वार्ताहर
गांधीनगर (ता.करवीर) बाजारपेठेतील मेन रोडवरील मचमोअर गारमेन्ट या दुकानात लेविस (LEVIS) या कंपनीचा माल असल्याचे भासवून बनावट लेबल लावून विक्रीसाठी ठेवण्यात आलेल्या ८ लाख १२१७५ रुपये किंमतीच्या जीन्स पॅन्ट जप्त करण्यात आल्या. याप्रकरणी कॉपीराइट ॲक्ट खाली दुकान मालक सुमित लक्ष्मणदास तलरेजा ( वय २७ रा. बॕरेक नंबर ४४/५ पाण्याच्या टाकी जवळ गांधीनगर) यांच्यावर गांधीनगर पोलिसात गुन्हा नोंद झाला आहे.
याबाबतची फिर्याद नेत्रिका कन्सल्टींगचे मॕन्यालु सुब्रमण्यम वेंकटेश (वय ४२, रा बेंगलोर) यांनी गांधीनगर पोलिसात दिली. मॕन्यालु वेंकटेश यांना गांधीनगर येथील मचमोअर गारमेंट या दुकानात लेविस कंपनीच्या लेबल खाली बनावट माल विक्री होत असल्याची माहीती मिळाली. कॉपीराईट अॕक्ट खाली या दुकानात धाड टाकली असता, लेवीस इंजिनिअर्ड जीन्स रेग्युलर लेव्ही स्ट्रॉस अँण्ड को या कंपनीचे लेबल बनावट मालावर प्रिंट करून लेविस कंपनीचा आहे असे भासवून वेगवेगळ्या रंगाचे व वेगवेगळ्या साईज असलेल्या ३२५ नग जीन्स पॅन्ट प्रत्येकी किंमत २४९९ असा ८ लाख १२१७५ रुपयांचा माल मिळून आला. याप्रकरणी कॉपीराइट ॲक्ट खाली दुकान मालक सुमित लक्ष्मणदास तलरेजा यांच्यावर गुन्हा नोंद झाला असुन अधिक तपास गांधीनगर पोलिस ठाण्याचे सपोनि दिपक भांडवलकर करीत आहेत.